रोहयोतील तक्रारी रोखण्यासाठी सोशल ऑडिटची मात्रा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 October 2012

रोहयोतील तक्रारी रोखण्यासाठी सोशल ऑडिटची मात्रा

मुंबई : राज्यातील रोजगार हमी योजनेतील तक्रारी कमी करण्यासाठी या योजनेतील कामांचे सोशल ऑडिट केले जाईल, असे रोजगार हमी योजना आणि जलसंधारणमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. राष्ट्रीय स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणून ओळखल्या जाणार्‍या या योजनेखाली यंदाच्या आर्थिक वर्षात 2500 कोटी रुपये उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे. प्रचलित कामांबरोबरच या योजनेखाली बकर्‍यांसाठी गोठे आणि मासे साठवण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीतील प्रतिनिधींना खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोरडवाहू शेतजमिनींवर बागायतींचे प्रयोग करणे, रोपवाटिका आणि विहिरींसाठी मोहिमा राबवणे, उत्कृष्ट कामासाठी जिल्हा स्तरावर बक्षिसे देणे, आदींवर भर देण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षात किमान 10 कोटी मनुष्य दिनाच्या कामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात साडेसहा कोटी मनुष्य दिनाचे काम झाले होते. यंदाच्या जूनमध्ये या योजनेतील कामावर दर आठवडय़ाला जवळजवळ सात लाख मजूर हजर होते, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS