शिक्षणात तामिळनाडू पॅटर्न? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 October 2012

शिक्षणात तामिळनाडू पॅटर्न?

मुंबई : महाविद्यालयीन शिक्षणात प्रवेशापासून परीक्षांच्या निकालापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याबाबत राज्य सरकार तामिळनाडू पॅटर्न वापरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे फेरमूल्यांकन करण्याची प्रक्रिया बराच काळ चालते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणात प्रवेशापासून परीक्षांच्या निकालापर्यंतची सर्व प्रक्रिया तामिळनाडूच्या धर्तीवर ऑनलाइन करावी, असा निर्णय उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी घेतला. त्यानंतर या दृष्टीने तामिळनाडूत कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते, याचा अभ्यास करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्याकडे नुकताच सादर केला. कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी एखाद्या शाखेसाठी प्रायोगिक तत्त्वावर संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया राबवावी, अशी शिफारस या समितीने केल्याचे समजते. राज्य शासन लवकरच यावर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS