मानसिक तणावामुळे रोज तीन हजार लोकांचा बळी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 October 2012

मानसिक तणावामुळे रोज तीन हजार लोकांचा बळी

सभ्यता, समाज व विज्ञानाच्या प्रगतीसह लोकांच्या दररोजच्या आयुष्यातहही खुप बदल आला आहे. यासह लोकांचा विचार, जीवन शैलीमध्येही खुप परिवर्तन झाले आहे. जास्त सुख व आरामच्या शोधात लोक मानसिक रोगाला बळी पडत आहेत. लोक जितके मॉडर्न व उन्नत होत आहेत, तितकी त्यांची इच्छा व अपेक्षांची मर्यादा वाढत आहे. ते हळूहळू मेंटल डिसऑर्डरकडे अगे्रसर होत आहेत आणि त्यांना याची जाणीव देखील होत नाही. यामुळे त्यांचे दररोजचे सहज व सरळ आयुष्य किचकट बनत आहे . जगातील ३५० मिलियन लोक मानसिक रोगाला बळी पडले आहेत. त्यांच्यासाठी मेंटल डिसआर्डरच सर्वात मोठ्या आजाराप्रमाणे उभे झाले आहे. वल्र्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनद्वारे केलेल्या एक सव्र्हेणानुसार भारत व अमेरिकेत सर्वात जास्त डिप्रेशन व मेंटल इलनेसचे त्रस्त मिळतील.


सव्र्हेक्षणानुसार दरदिवशी १० लोकांमध्ये एक जण या आजाराला बळी पडतो. जगातील १२५ मिलियन लोक मानसिक असंतुष्टीला बळी पडलेले आहेत. अमेरिकेत २४ टक्के लोक मेंटल डिसऑर्डरला बळी पडले आहेत, दुसरीकडे भारताचे १४ टक्के लोक या मानसिक आजाराने संघर्ष करीत आहेत.
वर्ष २०२० पर्यंत मेंटल डिसऑर्डर व मानसिक रोग सर्वात मोठ्या आजाराप्रमाणे समोर येईल. या आजाराने ग्रस्त होऊश्र जगात पूर्ण दिवसभरात ३ हजारपेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात. १४ ते ४४ वर्षीय वयातील लोकांमध्ये हे प्रमाण जास्त पहावयास मिळते.


मेंटल इलनेस काय आहे?
मेंटल इलनेस काहीही नव्हे तर मनाचा एक आजार आहे. जेव्हा तुमचे मन अस्वस्थ असते तेव्हा तुम्ही मेंटल डिसऑर्डरला बळी पडतात. झोप पूर्ण न होणे, दिवसभर विचार करणे, मानसिक तणाव, ऑफिस व आपल्या व्यक्तिगत आयुष्यता ओढताण, जीवन शैलीत बदल, पळापळ, दु:ख, फिलिंग ऑफ गिल्ट या सर्व कारणामुळे समस्या वाढते. हळूहळू व्यक्ती आस्थमा, इनसोमनिया, आर्थाइटिस, डाइबिटिज याप्रकारच्या आजाराला बळी पडतो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS