मुंबई- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने 2012 मध्ये देण्यात येणाऱ्या "गुणवंत कामगार' आणि "कामगार भूषण' या पुरस्कारांसाठी विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात आले आहेत. कापड, रेशीम गिरणी, अभियांत्रिकी, रसायन, औषध आदी उद्योग, बॅंका, एसटी महामंडळ, भारतीय आयुर्विमा महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महावितरण (निर्मिती आणि पारेषण), हॉटेल, दुकाने, शासकीय मुद्रणालय, माझगाव डॉक, बीपीटी; तसेच अन्य कारखान्यांत काम करणारे आणि मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियमाअन्वये (1953) कामगार कल्याण निधी भरणारे कामगार अर्ज करण्यास पात्र आहेत. हे अर्ज 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत कामगार कल्याण केंद्रांत उपलब्ध होतील. भरलेले अर्ज व्यवस्थापनाच्या शिफारशीसह कल्याण आयुक्त कार्यालयात (महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड, पश्चिम) 30 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारले जातील. संपर्क :022-24168792.
Post Top Ad
12 October 2012
Home
Unlabelled
"गुणवंत कामगार'साठी अर्ज पाठवण्याचे आवाहन
"गुणवंत कामगार'साठी अर्ज पाठवण्याचे आवाहन
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment