बाँबस्फोट तपासात दिल्ली पोलिसांची मनमानी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बाँबस्फोट तपासात दिल्ली पोलिसांची मनमानी

Share This


मुंबई - पुण्यातील साखळी बाँबस्फोट तपास प्रकरणी दिल्ली पोलिस मनमानी करत आहेत. निरापराधांना विनाकारण अटक केली जात असल्याची तक्रार छावा, भारत मुक्ती मोर्चा आणि कुल जमाती तन्जीम या संघटनांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली.
 
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील संघटनांचा शिष्टमंडळात समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासनही दिल्याची माहिती छावा युवा संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने आजपर्यंत 16 स्फोटांचा तपास केला आहे. यातील 15 प्रकरणातील आरोपींची न्यायालयाने निदरेष मुक्तता केली आहे. त्याबाबत जामिया टिचर्स सॉलीडेटरीटी असोसिएशनने बनवलेला अहवाल शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिला.
 
दयानंद पाटीलचे काय ?
एटीएसने संशयीत म्हणून पुण्यातील दयानंद पाटील याला पकडले होते. दिल्ली पोलिसांनी क्लिन चीट दिलेला पाटील सध्या गायब आहे. तो पतीत पावन संघटनेशी संबंधीत असल्याचा आरोप छावा संघटनेने केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages