बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा द्या - सुर्वे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा द्या - सुर्वे

Share This

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा शासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश सुर्वे यांनी केली. 

दहिसर (पूर्व) गावदेवी नगर, कोकणीपाडा परिसरातील पंचशील बुद्धविहार संस्थानच्या वतीने भव्य बुद्धविहाराची वास्तू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई ग्रंथालय यांच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादीचे उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश सुर्वे आणि संस्थानचे अध्यक्ष दिवाकर गोंडाणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश सुर्वे म्हणाले की, दलित आणि बौद्धांवर होणारे अन्याय, अत्याचार व हल्ले रोखण्यासाठी शासनाने कडक उपाययोजना करावी; अन्यथा दलित व बौद्धांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण चैत्यभूमी करावे, असेही त्यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि खा. संजय पाटील यांनी दलित व बौद्ध बांधवांच्या विकासासाठी तसेच शासकीय योजना प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी इंदू मिलची जागा देण्यासाठी शासन तत्त्वत: तयार असून केंद्र सरकारशी बोलणी चालू आहे. जागा हस्तातंर प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे येणार्‍या काही दिवसांतच काम पूर्ण होईल आणि इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचेही भाषण झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages