ब्रह्मंडात सापडला ताराचोर तारकासमूह - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 November 2012

ब्रह्मंडात सापडला ताराचोर तारकासमूह


वॉशिंग्टन : आपल्या आकाशगंगेच्या अगदी जवळ एक अनोखा तारकासमूह आढळून आला असून तो आपल्या आसपासच्या तार्‍यांची चक्क चोरी करतो. खगोलशास्त्रज्ञांनी हल्लीच अंतराळात या विशाल चुंबकीय ढगाचा शोध लावला आहे. छोटय़ा चुंबकीय ढगांच्या (एलएमसी) मदतीने आपल्या आसपासच्या तार्‍यांना तो आपल्याकडे ओढून घेतो. यामुळे हा तारकासमूह विचित्र व अनोखा ठरला आहे. अन्य तारकासमूहांतून तार्‍यांची चोरी करणे हीच या तारकासमूहाची सगळ्यात मोठी खासियत आहे. आपल्या आकाशगंगेनजीकच्या एका कृष्णविवराचा शोध घेत असताना खगोलशास्त्रज्ञांना हा तारकासमूह आढळून आला. त्यावेळी एक तारा एका छोटय़ा तारकासमूहातून खेचला जाऊन अचानक अन्य एका तारकासमूहात जाऊन मिळाला. या नव्या तारकासमूहाचे हे चौर्यकर्म खगोलशास्त्रज्ञांच्या तत्काळ नजरेस पडले. एलएमसीने तारा चोरल्यानंतर आकाशगंगेच्या बाह्यभाहात मॅसिव्ह कॉम्पॅक्ट हॉलो ऑब्जेक्ट तयार झाल्याचे शास्त्रज्ञांनी आढळून आले. असे मानले जाते की, कॉम्पॅक्ट हॉलो अंतराळातील असे कृष्णविवर आहे, जे अनेक आकाशगंगांना स्वत:मध्ये बांधून ठेवते. अतिधुसर व प्रचंड घनतेचे असल्यामुळे ते शक्यतो पाहिले जाऊ शकत नाही. अंतराळातील तारा चोरीचे भक्कम पुरावे शास्त्रज्ञांनी गोळा केले आहेत. सौरमंडळातून चोरून नेले जात असलेले हे तारे कृष्णविवराचा तर भाग बनत नाहीत ना, यावर खगोलशास्त्रज्ञ बारीक लक्ष ठेवून आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS