खाप पंचायत किंवा इतर कोणीही कायदे बनवू नयेत - सोनिया गांधी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 October 2012

खाप पंचायत किंवा इतर कोणीही कायदे बनवू नयेत - सोनिया गांधी



सचा खेऱा - भारत हा एक लोकशाहीप्रधान देश असून, कायदा बनविण्याची जबाबदारी संसदेकडे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस व न्यायव्यवस्थेकडे आहे. त्यामुळे खाप पंचायत किंवा इतर कोणीही कायदे बनवू नयेत, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (मंगळवार) केले.

हरियानामध्ये गेल्या महिनाभरात १३ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. गेल्या आठवड्यात एका दलित अल्पवयीन मुलीवर चार जणांनी बलात्कार केला होता, त्यानंतर तीने आत्महत्या केली होती. या मुलीच्या कुटुंबियांची आज सोनिया गांधी यांनी जिंद येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
सोनिया गांधी म्हणाल्या, ''बलात्कार प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांना कडक कारवाई करण्यात येईल. बलात्काराच्या घटना देशामध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर कारवाई करण्याची गरज आहे. बलात्काराच्या घटना फक्त हरियानामध्येच घडत नसून, देशभर अशा घटना घ़डत आहेत. त्यामुळे दोषींनी कडक शासन होणे गरजेचे आहे.''

हरियानामध्ये गेल्या काहि दिवसांत बलात्काराच्या घटना घडल्यानंतर प्रथमच एका राष्ट्रीय नेत्याने हरियानामध्ये जाऊन पिडीत कुटुंबियांची भेट घेतली आहे. हरियानाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी अद्याप एकाही पिडीत कुटुंबाची भेट घेतलेली नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS