'बेस्ट'चा अर्थसंकल्प सादर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 October 2012

'बेस्ट'चा अर्थसंकल्प सादर


बेस्टचा सन २०१३ - १४ चा ६१५२.५९ कोटीचा अर्थसंकल्प आज महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी बेस्ट समिती अध्यक्ष अशोक पाटील यांना सादर केला.  या प्रस्तावित अर्थसंकल्पात बसच्या भाड्यात किमान एक रूपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच वीज दारात चार टक्के वाढ सुचविल्याने मुंबई शहरातील वीज ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.
यामुळे महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या मुंबईकरांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. याआधी मुंबई आणि उपनगरांत रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ झाली आहे. मुंबईकरांच्या डोक्यावर भाडेवाढीचं ओझं दिवसेंदिवस वाढतांना दिसतंय. कारण टॅक्सी आणि रिक्षानंतर, सर्वसामान्याच्या प्रवासासाठी बेस्ट असणाऱ्या बेस्टचीही भाडेवाढ होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS