मनपाचे श्रद्ध घालून मनसेने केले सामूहिक मुंडन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 October 2012

मनपाचे श्रद्ध घालून मनसेने केले सामूहिक मुंडन


 

कांजुर डम्पिंग ग्राऊंडच्या मुद्दय़ावर महानगरपालिकेने सोमवारी स्थायी समिती सभागृहात एका बैठकीचे आयोजन केले. यामध्ये डम्पिंग ग्राऊंडबाबत 15 दिवसांत कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी सूचना महापौरांनी पालिका प्रशासनास केली आणि तोपर्यंत कचरा टाकण्यात येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. कांजुर डम्पिंग ग्राऊंडमध्ये निर्माण होणार्‍या दुर्गधी बंद करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करावा, अशी सूचना या वेळी महापौरांनी केली.
कांजुर डम्पिंग ग्राऊंडवरील कचर्‍यामुळे निर्माण होणार्‍या दुर्गधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणार्‍या परिणामांविरोधात मनसेने मनपाचे श्रद्ध आणि सामूहिक मुंडन करून अभिनव पद्धतीने आंदोलन केले. नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेत नगरविकासमंत्री भास्कर जाधव यांनी विधानसभेमधील मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांच्याशी संपर्क साधला. 

मुंबईचे मनपा आयुक्त सीताराम कुंटे, एमएमआरडीएचे आयुक्त राहुल अस्थाना यांनी या मुद्दय़ावर तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे विक्रोळी,पवई, भांडुप येथील जनतेला दिलासा मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS