मानवामुळे मंगळावरील वातावरण दुषित होईल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 November 2012

मानवामुळे मंगळावरील वातावरण दुषित होईल

लंडन : मंगळाच्या धरतीवर पाऊल ठेवण्यास मानवाला आणखी कदाचित दशके लागू शकतात, पण शास्त्रज्ञांनी आतापासूनच असा इशारा दिला आहे की, भविष्यात मानव मंगळभूमीवर पोहोचेल तेव्हा तो एकटाच जाणार नाही तर आपल्यासोबत नाना प्रकारचे अब्जावधी सूक्ष्म जंतूही घेऊन जाईल आणि या जंतूंमुळे या लाल ग्रहाचे वातावरण प्रदूषित होऊन जाईल. मंगळावर जाणार्‍या प्रत्येक अंतराळ शास्त्रज्ञासोबत कोटी-अब्जाच्या पटीत सूक्ष्मतंजू तिथे पोहचू शकतात, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटत आहे. पृथ्वीवर हे सूक्ष्म हजारो वर्षाच्या प्रक्रियेत विकसित झाले आहेत आणि मानव व अन्य प्राण्यांचे अन्न पचविण्यास आणि घातक जीवाणूंशी लढण्यास मदत करतात. असे असले तरी मंगळावरील पूर्णत: भिन्न स्वरूपाच्या वातावरणात ते कशा प्रकारची प्रतिक्रिया देतील, याबाबत काहीच सांगितले जाऊ शकत नाही, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. सर्च फॉर एक्स्ट्राटेरेट्रीय इंटेलिजन्स इन्स्टिटय़ूटचे प्रमुख संशोधक सिंथिया फिलीप यांच्या म्हणण्यानुसार, मंगळावरील वातावरण कायम राखणे आपलीच जबाबदारी आहे.
 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS