| मुंबई : केईएम रुग्णालयात अनुकंपा तत्त्वावर भरती झालेल्या तरुणाचा हक्क अद्यापही पालिका प्रशासनाकडून डावलण्यात येत आहे. आयुक्तांच्या जनता दरबारात गार्हाणे मांडल्यानंतर वरिष्ठ अधिकार्यांकडून अद्यापही त्या तरुणावरील अन्याय कायम आहे. पालिकेचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहेत.पालिकाच आपला हक्क डावलत असेल तर बाजू कोणापुढे मांडायची? असा सवाल बापलेक शेखर आणि सलील काळे करत आहे. शेखर काळे यांच्या पत्नी आशा काळे केईएम रुग्णालयात डी-2 स्टाफ नर्स म्हणून कार्यरत होत्या. 2004 मध्ये त्यांना कर्करोगाचे निदान झाले. काळे कुटुंबीयांनी उपचारावर लाखो रुपये खर्च केले, मात्र आशा काळे यांचे निधन झाले. अनुकंपा तत्त्वावर आशा काळे यांचा मुलगा सलील याची सफाई कामगार म्हणून भरती करण्यात आली. त्या वेळी सलील शिक्षण घेत असल्यामुळे त्यासाठी मिळणारी सवलत संबंधित अधिकार्यांनी मंजूर करूनही समय लेखन विभागाच्या अधिकार्यांकडून अडवणूक करण्यात आली. शिरोडकर मंडईतील कर्मचार्यांच्या निवासस्थानातील काही सदनिका कर्मचार्यांच्या वारसांच्या नावे करण्यात आल्या, मात्र काळेसाठी हा नियम लावण्यात आला नाही. त्यामुळे पालिकेचे अधिकारी काळे यांना सदनिका सोडण्यासाठी दबाव टाकत आहे. काळे यांच्यावर याचा कोणताही परिणाम होत नसल्याने त्यांच्या पत्नीच भविष्य निर्वाह निधीची 3 लाख 20 हजार 866 रुपयांची रक्कम आणि मुलाचे अनुकंपा तत्त्वावर इतर कायदेशीर रक्कम देण्यास आस्थापना विभागातील अधिकार्यांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. पालिकेच्या कर्मचार्यांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत देण्यात येते, मात्र कर्करोगासाठी पालिकेच्या नियमानुसार देण्यात येणारी रक्कम अचानक दीड लाखाने वाढवण्यात आल्यामुळे काळे कुटुंबीय यासाठी पात्र ठरले नाही. आईच्या उपचारासाठी झालेल्या खर्चासाठी काढलेले कर्जाचे व्याज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे काळे कुटुंबीय सध्या हलाखीचे जीवन व्यतीत करत आहे. या प्रकरणाबद्दल पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे धाव घेतली असता ते आधी मंडईतील सदनिका खाली करा, नंतर बोला अशी भाषा करत आहेत. विशेष म्हणजे सलीलचे वडील अपंग असून त्यांचा एक पाय कापण्यात आला आहे. काळे कुटुंबीयांच्या मागे लागलेले ग्रहण अधिकार्यांच्या मनमानीपणामुळे लागलेले आहे. पालिका आयुक्तांनी ठोस कार्यवाही करून या गरीब बापलेकाला न्याय द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. |
Post Top Ad
09 October 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment