रिपाइं महिला आघाडीची निदर्शने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 October 2012

रिपाइं महिला आघाडीची निदर्शने

मुंबई : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ रिपाइं महिला आघाडीच्या वतीने सोमवारी आझाद मैदान येथे निदर्शने करण्यात आली. रिपाइं महिला आघाडीच्या अध्यक्षा आशा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली 100 ते 1500 महिलांनी या वेळी तीव्र घोषणा देत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठय़ा पोलीस बंदोबस्तामुळे तो होऊ शकला नाही या वेळी उषाताई शेजवल, अभया सोनावणे, जयश्री कांबळे, फुलाबाई सोनावणे, मधुबेन जोशी, नैनाताई खैराट, पुष्पा ओव्हाळ, वैशाली जगताप, नैनाताई खराते, चंद्रकला वाढोरे, मीराबाई निळे, सलमा शेख, मुमताज शेख या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. सरकारने गॅस दरवाढीबाबत पुन्हा निर्णय घेतला नाही तर यापुढचे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा अभया सोनावणे यानी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS