यश चोप्रांचा मृत्‍यू डेंग्‍युमुळेच झाला का? पालिका घेणार शोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 October 2012

यश चोप्रांचा मृत्‍यू डेंग्‍युमुळेच झाला का? पालिका घेणार शोध



यश चोप्रांचा बळी घेणा-या डेंग्यूने मुंबई आणि पुण्यात हातपाय पसरले आहेत. मुंबईत आतापर्यंत डेग्‍यूने 3 जणांचे बळी घेतले असून 750 पेक्षा जास्‍त रुग्‍ण आढळून आले आहेत. विशेष म्‍हणजे मुंबईतील उच्‍चभ्रू वस्‍तीमध्‍ये 60 टक्‍के रुग्‍ण आढळले आहेत.  दरम्‍यान, यश चोप्रा यांचा मृत्‍यू डेग्‍युमुळेच झाला का, याचा शोध मुंबई महापालिका घेणार आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने अहवाल मागितला आहे.


हिंदी चित्रपट सृष्‍टीतील प्रसिद्ध दिग्‍दर्शक यश चोप्रा यांचे लीलवती रुग्‍णालयात डेग्‍यूमुळेच निधन झाले, असे निदान करण्‍यात आले. त्‍यांच्‍या घरी आणि यशराज फिल्‍म्स स्‍टुडिओमध्‍ये महापालिका अधिका-यांनी फवारणी करुन नमुने घेतले. त्‍याठिकाणी मोठ्या प्रमाणात एडिस इजिप्‍ती जातीचे डास आढळून आले. संशयित डेग्‍युमुळे यश चोप्रा यांना लीलावतीमध्‍ये दाखल करण्‍यात आले होते. परंतु, डेग्‍युचा संशय आल्‍यानंतर लीलावतीने महापालिकेला का माहिती दिली नाही, असा प्रश्‍न विचारणारी नोटीसही महापालिकेने बजावली आहे. केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयानेही यासंदर्भात अहवाल मागितला आहे. एडिस इजिप्‍ती या डासांमुळे डेंग्यू पसरतो. या डासांची मादी दिवसाच चावते.


डासांच्या प्रादुर्भावानं डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढलीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्युच्या रुग्णांची संख्या जास्‍त आहे. त्‍यापूर्वीच्‍या वर्षी मुंबईमध्‍ये मलेरियाने थैमान घातले होते. यंदा डेग्‍यूने थैमान घोतले. आहे. महापालिकेच्या रुग्णालयात 161 जणांना दाखल करण्‍यात आले आहे. तर खासगी रुग्‍णालयांमध्‍ये ही संख्‍या जास्‍त आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS