२९ ऑक्टोबरला बुद्धिस्ट परिषदेचे आयोजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 October 2012

२९ ऑक्टोबरला बुद्धिस्ट परिषदेचे आयोजन


मुंबई : युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशन या आंतरराष्ट्रीय स्तरावर धम्म प्रचारार्थ कार्यरत संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन मुंबईत साजरा होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर 29 ऑक्टोबरला आझाद मैदानाजवळ एका परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती फेडरेशनचे संस्थापक/अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी शुक्रवारी पत्रकार संघ येथे दिली.

या परिषदेत बौद्धांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक प्रश्नांवर तसेच बौद्ध विवाह कायदा होऊ नये की व्हावा, या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. बौद्ध लेण्यांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी शासनाने गांभीर्याने भूमिका घ्यावी, अन्यथा फेडरेशन तीव्र आंदोलन करेल, असे कांबळे म्हणाले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश आणि मुंबई कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS