मुंबई - बृहन्मुंबई पालिका कर्मचा-यांना यंदा 10 टक्के बोनस देण्याचा निर्णय पालिकेने मंगळवारी जाहीर केला. बोनसचा लाभ पालिकेच्या 1 लाख 30 हजार कर्मचा-यांना मिळणार असून पालिकेच्या तिजोरीवर मात्र 140 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
यंदाच्या दिवाळीसाठी महापालिका कर्मचा-यांना 12 हजार 100 रुपये, खासगी अनुदानित शाळा कर्मचा-यांना 6 हजार 50 रुपये, आरोग्य कर्मचा-यांना 3 हजार 300 रुपये, सफाई कर्मचा-यांना 1 हजार 980 रुपये तर कंत्राटी कर्मचा-यांना 4 हजार 678 रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मागीला वर्षी पालिकेने 8 टक्के बोनस जाहीर केला होता. यंदा वार्षिक पगाराच्या 10 टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


No comments:
Post a Comment