| मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाला तडे गेल्याचे बुधवारी ऐन गर्दीच्या वेळी उघडकीस आले. यावरून ये-जा करणार्या प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याचे उघड झाले असतानाही रेल्वे प्रशासनाने या पुलावरील रहदारी बंद केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मध्य रेल्वेचे कुर्ला रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे आणि गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकात हार्बर लाइनच्या लोकल गाडय़ांबरोबरच कुर्ला टर्मिनल आहे. त्यामुळे या स्थानकातून ये-जा करणार्या प्रवाशांची मोठी गर्दी असते, मात्र या स्थानकाकडे लक्ष देण्यासाठी रेल्वे प्रशासनाला वेळ नसल्याचे दिसून येत आहे. अनेक असुविधांचे माहेरघर असलेल्या कुर्ला रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 लगत असलेल्या पादचारी पुलाला बुधवारी रात्री तडे गेल्याचे उघडकीस आले, मात्र या गंभीर प्रकरणाची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते अजय बुडगुजर यांनी म्हटले आहे. पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आणूनदेखील प्रशासनाने हा पूल पादचार्यांसाठी बंद केला नाही. ज्या ठिकाणी तडा गेला आहे तेथे लाल कपडा बांधण्यात आला असून, प्रवासी त्या पुलावरून ये-जा करत आहेत. जर काही अपघात झाल्यास त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असे मनसेचे ओबेद खान आणि मुश्ताक खान यांनी म्हटले आहे. |
Post Top Ad
01 November 2012
Home
Unlabelled
कुर्ला रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाला तडे
कुर्ला रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाला तडे
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.


No comments:
Post a Comment