कांजूर डम्पिंग ग्राऊंडविरोधात जनआंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 October 2012

कांजूर डम्पिंग ग्राऊंडविरोधात जनआंदोलन


मुंबई : कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर सर्वोच्च न्यायालयाचा अवमानकरून अनधिकृतरित्या कचरा टाकला जात असल्यामुळे विक्रोळी पवई, कांजूर व नाहूर येथील नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. सततच्या येणार्‍या वासाने परिसरातील जनता हैराण झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

या डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणार्‍या कचर्‍यांच्या गाडय़ा तत्काळ थांबवल्या नाहीत तसेच हे डम्पिंग ग्राऊंड प्रस्तावित शिळफाटा-तळोजा येथे स्थलांतरित केले नाही तर येत्या सोमवारी 15 ऑक्टोबर रोजी आंदोलनाचा इशारा देतानाच विक्रेाळीचे आमदार मंगेश सांगळे यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी 10 वाजता कांजूर डम्पिंग ग्राऊंड इर्स्टर्न एक्स्प्रेस हायवे विक्रोळी येथे डम्पिंग ग्राऊंडचे श्रद्ध घातले जाणार आहे. आमचे विधानसभा गटनेते आ. बाळा नांदगावकर या आंदोलनात सहभागी होणार असून, माझ्यासह इतर रहिवासी सामूहिक मुंडन याप्रसंगी करणार आहेत. तुम्हाला वास येतो ना, मग या जन आंदोलनात सामील व्हा, असे आवाहन आ. मंगेश सांगळे यांनी कले आहे.

डम्पिंग ग्राऊंडची प्रक्रिया 2002 सालापासून सुरू झाली असून मुंबई मनपाने याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीत 17 डिसेंबर 2008 रोजी मंजूर केला होता. हा प्रस्ताव आला तेव्हा मुंबई मनपा व शासनाने सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती दिली आहे.  विधानसभेतील अर्थसंकल्पिय अधिवेशात लक्षवेधी सूचनेत डम्पिंद ग्राऊंडवर उपप्रश्न विचारून आ. सांगळे यांनी नगर विकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी कांजूरचे डम्पिंग ग्राऊंड शिळफाटा-तळोजा येथे स्थलांतरित करण्याचे आश्वासन राज्यमंर्त्यांनी दिले, तरीही अद्याप या डम्पिंग ग्राऊंडवर अनधिकृतरित्या कचरा टाकला जातो आहे. या डम्पिंग ग्राऊंडची दुर्गधी आता असह्य झाली असून, याविरोधात जनतेचा संपात वाढत आहे आणि म्हणूनच या जनक्षोभाला वाचा फोडण्यासाठी सोमवती आमावास्येच्या दिवशी सोमवारी 15 ऑक्टोबर रोजी या डम्पिंग ग्राऊंडचे श्रद्ध घालण्यात येणार आहे तसेच संतप्त रहिवाशांनी सामूहिक मुंडनाचा निर्धार केला असल्याचे आ. सांगळे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS