बकरी ईदसाठी देवनार पशुवधगृह सज्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 October 2012

बकरी ईदसाठी देवनार पशुवधगृह सज्ज


मुंबई : आशियातील सर्वात मोठे पशुवधगृह म्हणून ओळखल्या जाणार्‍या देवनार येथे बकरी ईदनिमित्त पालिका सज्ज झाली आहे. आयुक्त सीताराम कुंटे यांनी शनिवारी संबंधित विभागातील अधिकार्‍यांशी विशेष बैठक घेत सर्व सोयीसुविधा जाणून घेतल्या.

यंदा 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान बकरी ईद आहे. देशभरातून कुर्बानीकरिता जनावरे देवनार पशुवधगृहात आणण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी 2 लाख जनावरे देवनार पशुवधगृहात दाखल होत असतात. त्याचप्रमाणे विक्रेते आणि खरेदीदारही त्या ठिकाणी येत असतात. ही बाब लक्षात घेऊन देवनार पशुवधगृहाची सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. दररोज असणार्‍या 70 सुरक्षा रक्षकांव्यतिरिक्त अतिरिक्त 140 सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. कायदा व सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांसाठी 13 मंडप व 7 टेहळणी मचाण उभारण्यात आले आहेत.या काळात देवनार पशुवधगृहाभोवती होणार्‍या वाहतुकीचे नियमन करण्यात येणार आहे. याशिवाय 1.3 एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच पिण्यासाठी 8 पाणपोई व 50 नळ बसवण्यात येणार आहेत.विद्युत व्यवस्थेव्यतिरिक्त 40 वॅटच्या 922 टय़ूब्ज, 500 वॅटचे 200 हॅलोजनच्या दिव्यांची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन व्यवस्थेसाठी 63.5 के.व्ही. क्षमतेच्या 4 जनरेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS