बोगस पत्रकारांचा सुळसुळाट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 November 2012

बोगस पत्रकारांचा सुळसुळाट

http://jpnnews.webs.com/news.htm
विविध कारणांसाठी आयोजित केल्या जाणारया पत्रकार परिषदेमध्ये कित्येक वेळा भुरटे पत्रकार शिरलेले असतात. या पत्रकारांकडे कोणत्याही पेपरचे ओळखपत्र नसते. फक्त पत्रकार परिषदांमध्ये कोणत
ी बातमी आहे त्या बातमीचे गांभीर्य किती यापेक्षा पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना कोणी काही देते आहे का याचाच शोध बोगस पत्रकारांकडून घेतला जात असतो. अश्या बोगस पत्रकारांचा सूळसुळाट सध्या मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब मुंबई येथे झाला आहे. अश्या बोगस पत्रकारांवर कारवाही करून पत्रकार परिषदांमध्ये बोगस पत्रकारांना मज्जाव करावा अशी मागणी पत्रकारांकडून केली जात आहे.


अशाच बोगस पत्रकारांचा सूळसुळाट सध्या मुंबईमधील पंचतारांकित हॉटेल मध्ये सुद्धा झाल्याचे पीआर एजन्सी चालकाकडून सांगण्यात येत आहे. या बोगस पत्रकारांना कोणीही पत्रकार परिषदांना बोलावले नसले तरी कुठे पत्रकार परिषद आहे याची माहिती कुठूनही मिळवून आपल्या चार पाच साथीदारांसह पत्रकार परिषदेमध्ये येवून गिफ्ट वसुली करण्याचे काम राज रोस पणे हे बोगस पत्रकार करत असतात. यामध्ये पुरुष पत्रकारांप्रमानेच महिला पत्रकारंचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आपली प्रतिमा मलीन होईल म्हणून आम्हाला सरवांच्या समोर यांच्याशी भांडता सुद्धा येत नाही, यामुळे या बोगस पत्राकारांचे फावत असल्याचे असे एका पीआर एजन्सी चालकाने सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS