मुंबई / रशीद इनामदार
(जाधव प्रेस नेटवर्क) न्यूज वेबसाईट http://jpnnews.webs.com
पावसाळा संपत आला कि दिवाळीच्या सुट्टीच्या आधी पासून मुंबई आणि उपनगरातील शाळकरी मुले आणि काही तरुण यांना पतंग उडवण्याचा , एकमेकांची पतंग पेच लावून कापण्याचा आनंद घ्यावासा वाटतो . त्या कापलेल्या पतंगी पकडण्यासाठी चढा ओढ लागते . एकदाची पतंग मिळाली कि खूप काही मिळविल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो.परंतु असे करताना धावताना लक्ष फक्त पतगाकडे असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता दाट असते. येणारी जाणारी वाहने . उघडी गटारे यामुळे पतंगाच्या पायी धोका होण्याचा संभव बळावतो.
असाच काहीस चित्र बांद्रा कुर्ला संकुल आणि आसपासच्या परिसरात हल्ली दिसत आहे. संकुलाच्या जवळ असलेल्या टाटा वसाहत , भारत नगर या परिसरातील मुले आणि काही तरुण दररोज संध्याकाळी पतंग उडवतात त्यात पेच लावून पतंगांची कापाकापी होते. कापले गेलेले पतंग पकडण्यासाठी धावपळ करतात . बांद्रा कुर्ला संकुलामधील मुख्य रस्त्यावरून वाहने वेगात ये जा करत असतात . त्या वाहनांचे भान हि न बाळगता पतंग पकडण्यासाठी जीव धोक्यात घालून पळापळ सुरु असते. बर्याचदा अपघातातून थोडक्यात बचावलेल्या घटनाही इथे घडल्या आहेत . मुले पतंगासाठी जीव धोक्यात घालत असल्यामुळे त्यांच्या मातापित्यांच्या जीवाला घोर लागला आहे .

No comments:
Post a Comment