सुरक्षेसाठी रेल्वेचे असुरक्षित प्रयत्न .... - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 October 2012

सुरक्षेसाठी रेल्वेचे असुरक्षित प्रयत्न ....


Photo0436.jpg


मुंबई /  रशीद इनामदार
(जाधव प्रेस नेटवर्क) न्यूज वेबसाईट http://jpnnews.webs.com     
रेल्वे प्रवाशांनी एका फलाटावरून  दुसऱ्या फलाटावर जाताना रूळ ओलांडून जीवाचा धोका पत्करू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे स्थानकांवर रुळांच्या मध्ये जाळ्या लावल्या आहेत . त्यामुळे प्रवाशांना कितीही घाई असली तरी पुलांचा अथवा भुयारी मार्गांचा वापर करण्याशिवाय पर्याय उरत नाही. हि बाब खरेच प्रवाशांच्या दृष्टीने जरी त्रासदायक असली तरीही सुरक्षित आहे. मानखुर्द येथील रेल्वे स्थानकात हि अशीच व्यवस्था प्रशासनाने केली आहे परंतु एका ठिकाणी जाळी न लावल्याने हि व्यवस्था सुरक्षेसाठी करून हि असुरक्षित ठरली आहे. प्रवाशी त्या ठिकाणाहूनच रूळ ओलांडतात . फलाटा पासून हे अंतर जास्त आहे तरीही त्याच मार्गे प्रवाशी रूळ ओलांडतात . त्याठिकाणी गर्दीही होते . बहुतेकदा मध्ये आल्यावर दोन्ही बाजूने रेल्वे गाड्या हि येतात तरीही प्रवाशी त्या जाळीला पकडून मध्येच उभे राहतात व जीवाचा धोका पत्करतात . त्यामुळे अपघाताची शक्यताही वाढते .
     रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी पूल आहे परंतु हा short  cut  मिळाल्यामुळे प्रवाशी पुलाचा वापर करणा टाळतात . काही जन पुलाचा वापर करतात परंतु पुलावरून उतरल्यावर त्यांना बाहेर यायला रस्त्यातच बसलेल्या भाजीविक्रेत्यांमुळे वाट मिळत नाही. रेल्वे प्रशासन या समस्येकडे गंभीरपणे पाहील का ?पुलाचा वापर करण्यासाठी  प्रवाश्यांना व रहिवाश्यांना भाग पडावे यासाठी प्रयत्न करेल का ? पुलाशेजारी असलेल्या भाजीविक्रेत्यांना थोडीशी वाट सोडून बसण्यासाठी विनंती करेल का ? असा प्रश्न बरयाच नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे . जेणेकरून सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने केलेले प्रयत्न पूर्णपणे सुरक्षित ठरतील .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS