सेक्स रॅकेटचा पर्दाफाश / 300 तरुणींना अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 October 2012

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश / 300 तरुणींना अटक



मुंबई - दक्षिण मुंबईतील ग्रँट रोडवरील एका इमारतीत पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात बेकायदा सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गुरुवारी मध्यरात्री पर्दाफाश केला. या वेळी 300 तरुणी आणि 140 ग्राहकांना पोलिसांनी अटक केली. ग्रँट रोडवर एका इमारतीत मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी बारीक नजर ठेवून येथे येणा-या-जाणा-यांची पाहणी केली. तसेच बनावट ग्राहक पाठवून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री करून घेतली. याबाबत पक्की खबर मिळाल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री या इमारतीवर पोलिसांनी धाड टाकली.  अटक करण्यात आलेल्या अनेक तरुणी बांगलादेशी आहेत. तर काही मुली अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS