हंडोरेंच्या काळात ४५० कोटींचा घोटाळा! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

हंडोरेंच्या काळात ४५० कोटींचा घोटाळा!

Share This

प्रकाश आंबेडकर यांचा आरोपमुंबई - आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या कार्यकाळात मागासवर्गासाठी असणार्‍या ४५० कोटींचा घोटाळा झाला आहे. यात कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी असे दोन्ही कॉंग्रेसचे आजी माजी आमदार व पदाधिकारी सामिल असल्याने सरकार चौकशील टाळाटाळ करीत असल्याचा आरोप भारिप महाजन बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला.
भारिप पक्ष कार्यालयाच्या पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. सामाजिक न्यायफ खात्याने मागासवर्गात उद्योजकता वाढीस लागावी, यासाठी जी योजना तयायर केली ती कागदोपक्षी राबवली गेल्याचे आंबेडकर म्हणाल. चंद्रकांत हंडोरे यांनी ३०० कोटींचा निधी राज्यात समन्यायी पद्धतीने न वाटप न करता केवळ हातकणगंले या एकाच तालुक्यात कागदोपत्री असणार्‍या सहकारी संस्थांना वाटप केला. ज्यांना कोट्यावधी रूपये देण्यात आले, त्या संस्था बोगस आहेत. यात कॉंगे्रस व राष्ट्रवादीच्या अनेक आजी माजी आमदार व पदाधिकार्‍यांचा समावेश असल्याने त्याच्या चौकशीची टाळाटाळ करीत अससल्याचे आंबेडकर म्हणाले.
हंडोरेंचे हे प्रताप समोर आल्यानंतर सरकारने मागासवर्गीयांच्या संस्थांना निधी वाटप करणे बंद केले. हा निधी कपात होत नसल्याने तो पुढच्या वर्षी सुद्धा वापरला जाऊ शकतो. त्यामुळे ज्या संस्था प्रत्यक्षात प्रकल्प राबवत आहेत, अशांना निधी मिळण्याची गरज आहे. मात्र मुख्यमंत्री व सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे दोघेही टोलवाटोलवी करत आहेत. मोघे यांनी तात्काळ याबाबत धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.

मोघेंवर फौजदारी दाखल करू!मागासवर्गीय हक्काचा निधी इतरत्र वळवता येत नाही. मात्र मागील वर्षी हाच निधी अजित पवार यांनी इतरत्र वळवला होता. आगामी काळातही दलितांचा हजार कोटींचा निधी वळवला जाण्याची शक्यता आहे. असे झाले तर आपण मोघेंवर फौजदारी दाखल करून, असा इशारा आंबेडकर यांनी यावेळी दिला.

मुस्लिमांच्या कॉंगे्रस फारकतीचे स्वागतनांदेड वाघाळा महापालिकेत मुस्लिम मतदारांनी कॉंगे्रस पक्षाला बाजूला करून एमआयएम या पक्षालाा जवळ करून जो संदेश दिला, त्याचे आपण स्वागत करीत असल्याची प्रतिक्रिया आंबेडकर यांनी दिली. मुस्लिम मतदारांना कॉंगे्रसपेक्षा पर्याय उभे होणे आवश्यक आहे. मात्र पुढे विधानसभा, लोकसभा याही निवडणुकांमध्ये ते समर्थ पर्याय पुढे यावेत. मात्र तसे होता दिसत नाही. एमआयएम या पक्षाचे ११ नगरसेवक विजयी होणे ही कॉंगे्रस पक्षाला आगामी काळात मराठवाड्यात चितेंची बाब ठरणार आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages