ठामपाच्या स्थायी समिती सभापती पदी रवींद्र फाटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2012

ठामपाच्या स्थायी समिती सभापती पदी रवींद्र फाटक

ठाणे / विठ्ठल कांबळे (९६१९०७६४४३)        
               ठाणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदाची  निवडणुक मंगळवार दि. १६ ऑक्टो २०१२ रोजी  सकाळी स्थायी समितीच्या कै. अरविंद पेंडसे सभाग्रहात पार पडली. यावेळी  कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसे लोकशाही आघाडीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा लॉटरी पद्धतीने विजय झाला. यावेळी पीठासन अधिकारी म्हणून  मुंबई उप-नगर जिल्हाधिकारी संजय देशमुख यांनी काम पहिले.

ठाणे मनपाच्या महापौर पदासाठी महायुतीत मनसे शामिल झाली होती मात्र  स्थायी समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस आणि लोकशाहीत मनसे शामिल झाल्याने निवडणूक चुरशीची ठरणार होती. गेल्या शुक्रवारी शिवसेना,भाजप,रिपाई महायुतीतील बसपाचे विलास कांबळे तर कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसे लोकशाही आघाडीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी नामांकन दाखल केली होती.यावेळी झालेल्या निवडणुकीत रवींद्र फाटक आणि विलास कांबळे यांना ८/८ समान मते मिळाली. दरम्यान समान मते मिळाल्याने चीट्या टाकून उमेदवार घोषित करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.


यावेळी कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसे लोकशाही चे उमेदवार रवींद्र फाटक यांचे चीट्टीत त्याचे नाव निघाल्याने पीठासन अधिकारी यांनी रवींद्र फाटक यांना विजयी घोषित केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS