हिवाळी अधिवेशन 10 डिसेंबरपासून - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2012

हिवाळी अधिवेशन 10 डिसेंबरपासून

मुंबई : येत्या 10 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार्‍या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दोन आठवडय़ांचा कार्यक्रम बुधवारी निश्चित करण्यात आला. या अधिवेशनात एकूण 11 विधेयके सादर करण्यात येणार आहेत. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे येत्या 10 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाचा कार्यक्रम ठरवण्यासाठी विधान भवनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत 10 ते 21 डिसेंबर असा दोन आठवडय़ांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. जादूटोणा व अनिष्ट प्रथा-रूढी विधेयकासह 11 महत्त्वांची विधेयके अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्था, दुष्काळ, सिंचन, धान आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांना पहिल्या दिवशी श्रद्धांजली वाहून दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात येणार आहे. अधिवेशन दोन आठवडे चालण्याची शक्यता आहे. विरोधकांनी मात्र अधिवेशन तीन आठवडे चालवण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS