पालिका रुग्णालयात होणार केमोथेरपी व रेडिओथेरपीचे उपचार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 November 2012

पालिका रुग्णालयात होणार केमोथेरपी व रेडिओथेरपीचे उपचार

मुंबई : मुंबईत कॅन्सरवर उपचार करणारे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नसल्याने पालिकेच्या केईएम, सायन आणि नायर या प्रमुख तीन रुग्णालयांमध्ये कॅन्सरपीडित रुग्णांवर केमोथेरपी व रेडिओथेरपीचे उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालिका आरोग्य समिती अध्यक्षा गीता गवळी यांनी सांगितले.

पालिकेच्या या तिन्ही रुग्णालयांत कॅन्सर रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जातात, मात्र त्यांच्यावर केमोथेरपी आणि रेडिओथेरपी उपचार करण्यासाठी टाटा रुग्णालयातील पाठवावे लागते. टाटा रुग्णालयातील उपचारांसाठी त्यांना 6-6 महिने वाट पाहावी लागते. अशामुळे या रुग्णांमध्ये कॅन्सरचा प्रादूर्भाव वाढतो. यामुळे अशा रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी केमोथेरपी व रेडिओथेरपी उपचार पालिका रुग्णालयात केले जावेत, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी 16 ऑक्टोबर 2012 रोजीच्या ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. ही सूचना सभागृहात येण्यापूर्वीच मंगळवारी आरोग्य समितीच्या बैठकीत प्रशासनाच्या वतीने कॅन्सर रुग्णांवर यापुढे पालिकेचा केईएम, सायन व नायर रुग्णालयांत केमोथेरपी व रेडिओथेरपी उपचार केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. नायर रुग्णालयात कॅन्सर रुग्णांसाठी 75 खाटांची विशेष व्यवस्था केली जाणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. नायर डेंटल रुग्णालयातही मुलाच्या कॅन्सरवर उपचार केले जाणार असल्याची माहिती गीता गवळी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS