अंगणवाडी महिलांचे आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अंगणवाडी महिलांचे आंदोलन

Share This
मुंबई : राज्यातील अंगणवाडी महिलांचे मंगळवारी आझाद मैदानात उपोषण सुरू झाल्यानंतर बुधवारी आंदोलन करण्यात आले. 10 ते 15 हजार अंगणवाडी महिलांनी शासनाच्या नावाचा उदोउदो करत निषेध केला. या वेळी संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी शासनाला निवेदन दिले.

महागाई भत्ता, बोनसचा प्रश्न, भाऊबीज भेट, वार्षिक वेतनवाढ, गणवेशाचा प्रश्न, निवृत्ती लाभ, आरोग्याचा प्रश्न, एक महिन्याची उन्हाळी सुट्टी आदी मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले. मैदानात जागा अपुरी पडू लागल्याने रस्त्यावर उभे राहून या महिलांनी आंदोलनात सहभाग घेतला.

राज्यातील ग्रामीण भागात बालकांच्या सर्वागीण वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी ही महिलांची फौज वेळोवेळी आंदोलन करत बसणार का? असा सवाल बृजपाल सिंह यांनी या वेळी केला. कौसल्या भरतकुमार शर्मा या अंबेजोगाईवरून आलेल्या अंगणवाडी महिला कर्मचार्‍याने सरकारच्या वेळकाढू धोरणाचा निषेध केला. शासनाने दिवाळीपूर्वी मागण्यांबाबत योग्य ती भूमिका घेतली नाही तर हे उपोषण तीव्र करण्यात येईल, असा इशारा सिंह यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages