पालिकेच्या जकातीच्या उत्पन्नात 13 टक्क्यांनी वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 November 2012

पालिकेच्या जकातीच्या उत्पन्नात 13 टक्क्यांनी वाढ

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्नेत असणार्‍या जकातीच्या उत्पन्नात 7 महिन्यांत 12.94 टक्के वाढ झाली आहे. 1 एपिल्र 2012 ते 31 ऑक्टोबर 2012 पर्यंतच्या 7 महिन्यांच्या कालावधीत जकातीपासून पालिकेला सुमारे 3837.61 कोटी इतका महसूल प्राप्त झाला असून गेल्या वर्षी याच कालावधीत हे जकात उत्पन्न 3397.68 कोटी इतके होते. याचाच अर्थ असा की, पालिकेला जकातीपासून मिळणार्‍या महसुलात 439.93 कोटी इतकी वाढ झाली आहे.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सन 2011-12 च्या आर्थिक वर्षासाठी 6 हजार 900 कोटी रुपयांचे जकातीचे टार्गेट धरले आहे. पालिकेला मिळणार्‍या एकूण महसुलापैकी 40 टक्के महसूल जकातीतून मिळतो. आतापर्यंत 7 महिन्यांत 3837.61 कोटी रुपये जकातीतून मिळाले असून 1 नोव्हेंबर 2012 ते 31 मार्च 2013 या राहिलेल्या पाच महिन्यांत उर्वरित सुमारे 3 हजार 100 कोटींचे ध्येय पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, विधी समिती अध्यक्ष राजू पेडणेकर यांनी या वर्षी जकातीचे उत्पन्न कमी झाल्याचे सांगितले असल्यामुळे नक्की सत्य काय असा संभ्रम निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS