मुंबई : राज्यातील महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियामध्ये कोटय़वधींचा भ्रष्टाचार झाला आहे. शेकडो विद्यार्थी आजही प्रवेशापासून वंचित आहेत. मागच्या दाराने प्रवेश घ्या म्हणून दलालांचे फोन पालकांना येत आहेत. अशा प्रकारे सुरू असलेल्या कारभाराकडे मुख्यमंर्त्यांनी गांभीर्याने लक्ष घातले नाही तर गोरगरीब जनतेची मुले कधीच डॉक्टर बनणार नाहीत, असे स्पष्ट मत 'फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन' या संघटनेचे अध्यक्ष जयंत जैन यांनी गुरुवारी आझाद मैदानात व्यक्त केले.
एम. बी. वी. एस. व बी. डी. एस. चे प्रवेश सुरू झाल्यानंतर सरकारच्या नियमाप्रमाणे दोन राऊंड ऑनलाईन पद्धतीने ठिक झाले. मात्र तिसरा राऊंड दलालामार्फत सुरू आहे. 20-25 लाख द्या व मागच्या दाराने या, असे एसएमएस येत आहेत. प्रवेश नियंत्रण समितीसुद्धा हाताची घडी तोंडावर बोट अशा स्थितीत आहे. राखीव जागाही लाखो रुपयाने विकल्या जात आहेत. सरकारने तिसर्या राऊंडची सखोल चौकशी करून 400च्या पुढे संख्या असणार्या प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून द्यावा, अशी मागणी महादेव रगळे यांनी या वेळी केली.
Post Top Ad
02 November 2012
Home
Unlabelled
'फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन'ची निदर्शने
'फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन'ची निदर्शने
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment