एमएमआरडीए बेस्टला बसेस देणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 November 2012

एमएमआरडीए बेस्टला बसेस देणार


मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलात जाण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी आणि प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी एमएमआरडीएने एक पाऊल पुढे टाकले आहे. एमएमआरडीए बेस्टला जवळपास 5 कोटी रुपये खर्च करून कमी उंचीचे दरवाजे असलेल्या 15 ते 20 बसेस पुरवणार आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलात येण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावरून कुर्ला आणि पश्चिम रेल्वेवरून वांद्रे हे दोन पर्याय जवळचे आहेत. बेस्टला मरणाची गर्दी असल्यामुळे प्रवासी रिक्षाचा पर्याय स्वीकारतात. बेस्टने या अगोदरच वांद्रे स्टेशन ते वांद्रे-कुर्ला संकुल, टेलिफोन एक्स्चेंज आणि कुर्ला ते एमएमआरडीए कार्यालय अशी रिंगरूट सेवा सुरू केली आहे, मात्र या सेवेचा 10 रुपयांचा दर जास्त असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे. बेस्टला पर्याय असलेल्या रिक्षाचालकांची भाडय़ासाठी नेहमीच दादागिरी सुरू असते. मनाला पाहिजे तसे भाडे रिक्षाचालक आकारत असल्यामुळे प्रवासी नाईलाजाने पर्याय स्वीकारतात. यावर तोडगा म्हणून एमएमआरडीए बेस्टला सहाय्य करणार आहे. एमएमआरडीए बेस्टला देणार्‍या बसेचचा आर्थिक भार उचलणार आहे. येत्या शनिवारी या मार्गावर चाचणी घेण्यात येणार आहे. बेस्टच्या तिकिटाच्या दरापेक्षा या बसेसचा दर कमी असेल याकडे लक्ष देईल देण्यात येईल, असे सहप्रकल्प संचालक आणि जनसंपर्क अधिकारी दिलीप कवठकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS