मुंबईत 50 टक्के मोबाईल टॉवर अनधिकृत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 November 2012

मुंबईत 50 टक्के मोबाईल टॉवर अनधिकृत

पालिका सभागृहात कारवाईची मागणी
मुंबई : मुंबईत जागोजागी मोबाईल टॉवरचे जाळे पसरले असून, या टॉवरमधून निघणार्‍या किरणोत्सारामुळे मुंबईकर कॅन्सर, हृदयविकार, मनोविकार, रक्तदाब यासारख्या रोगांना बळी पडत आहेत. मुंबईतील 50 टक्के मोबाईल टॉवर अनधिकृत असून पालिकेने या टॉवरवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक विनोद शेलार यांनी शुक्रवारी 66 ब कलमान्वये पालिका सभागृहात केली. त्यांच्या या मागणीस अनेक नगरसेवकांनी पाठिंबा देत आपली मते मांडली.

मुंबईत काही सोसायटय़ा, इमारतीच्या देखभाल खर्च वसूल करण्यासाठी अनधिकृतपणे नियम धाब्यावर बसवून मोबाईल टॉवर उभारण्यास परवानगी देतात. 2010 पाहणीनुसार मुंबईत अंदाजे 3500 टॉवर्सपैकी 1628 टॉवर अनधिकृत असून ती संख्या आता वाढली आहे. काही इमारतींवर एकाच ठिकाणी पाच-सहा टॉवर उभारण्यात आल्यामुळे इमारतीलाही धोका निर्माण होऊ शकतो. मोबाईल टॉवरमुळे शरीरातील पेशीची विकृत वाढ होणे, सजिवांच्या डीएनए/आरएनएच्या रासायनिक संररचनेला हाणी पोहचणे, स्मरणशक्ती कमी होणे, भूक मंदावणे, चीडचीड होणे, ब्रेन टय़ुमर, मनोविकार, हृदयविकाराचे प्रमाण वाढणे, प्रजनन संस्था व संपूर्ण केंद्रीय मज्जासंस्थेवर अनिष्ट परिणाम होणे, इत्यादी धोके निर्माण होत असल्याचे शेलार यांनी सांगितले. 

मोबाईल टॉवर लावण्यात आलेल्या 400 मीटरच्या परिसरात राहणार्‍या लोकांमध्ये गेल्या 10 वर्षात कॅन्सरच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे शेलार यांनी सांगितले.या मोबाईल टॉवरविरोधात तक्रार करण्यासाठी 4 हजार रुपये भरायला लागत असल्याने तक्रारींना वाढता प्रतिसाद मिळत नाही. मोबाईल टॉवर उभारणार्‍या अनेक कंपन्या आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरवून दिलेली 600 मायक्रोवॅट क्षमतेची प्रक्षेपणाची पातळी ओलांडून 7620 पर्यंतच्या क्षमतेचे अत्यंत घातक प्रक्षेपण करतात. असे सांगण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त गुप्ता यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण करताना सांगितले की, मुंबईत मोबाईल टॉवरपैकी 1830 टॉवर अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले. इमारतींवर मोबाईलवर टॉवर उभारण्यासाठी 1995 पासून परवानगी देण्यात आली. नंतर हे प्रकरण 2010 रोजी कोर्टात गेले. त्यानंतर केंद्राने आखलेल्या धोरणानुसार शाळा, रुग्णालये यावर मोबाईल टॉवर उभारण्यास मनाई केली गेली. पालिका किरणोत्साराबाबत 'टर्म सेलकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी हे प्रकरण निकाली काढण्यासाठी विशेष वकील देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच एका इमारतीवर दोनपेक्षा जास्त टॉवर उभारता येणार नाही, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS