इंदू मिलच्या प्रश्नावर सोनिया गांधींना भेटणार - प्रा. कवाडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 November 2012

इंदू मिलच्या प्रश्नावर सोनिया गांधींना भेटणार - प्रा. कवाडे


मुंबई : केंद्रात आणि राज्यात काँग्रेसप्रणीत आघाडीचे सरकार असल्याने वेळ न घालवता सरकारने इंदू मिलचा प्रश्न 6 डिसेंबरपूर्वी सोडवावा, असे आवाहन करत इंदू मिलसह मागासवर्गीयांच्या अन्य प्रश्नांवर दिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिली. गरज भासल्यास इंदू मिलच्या विषयावर मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांना घेऊन यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेऊ, अशी माहितीही त्यांनी दिली. 'भीमालय' या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना प्रा. कवाडे म्हणाले की, केंद्रात 13 मार्च 1983 पासून बौद्ध विवाह व वारसा हक्क कायद्याचे विधेयक पल्रंबित आहे. तत्कालीन कायदामंत्री हंसराज भारद्वाज यांनी या संदर्भातील उपस्थित झालेल्या अशासकीय विधेयकावर उत्तर देताना विधेयक आणण्यात येईल, अशी ग्वाही राज्यसभेत दिली होती. आता राज्य सरकारनेही प्रारूप ठरवण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. राज्याने हा कायदा करण्याचे विधेयक हिवाळी अधिवेशनात सादर करण्साठी आग्रह राहणार असल्याचे प्रा. कवाडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS