| मुंबई : वन्यजैविक साखळीत वाघ परमोच्च स्थानी असल्याने त्यांचे अस्तित्व टिकले पाहिजे. वाघ राहिले तरच ही जैविक साखळी वाचेल आणि पर्यावरणाचे आपोआपच संरक्षण होईल. त्यामुळे सह्याद्रीपट्टय़ातील वाघ वाचवण्यासाठी सर्वानी सज्ज व्हावे, असे आवाहन 'टायगर कॉन्झर्वेशन अँण्ड रिसर्च सेंटर'चे (टीसीआरसी) अध्यक्ष प्रसाद हिरे यांनी नुकतेच केले. महाष्ट्रात वाघांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे म्हणून जनजागृती करण्यासाठी टीसीआरसीने 'तळकोकण अँडव्हेंचर : सह्याद्रीचा वाघ वाचवा' हे अभियान नुकतेच चालवले. याअंतर्गत युवा मावळ्यांनी मुंबई ते कराड अशी मोटारसायकल रॅली काढली होती. खोपोली, दापोली, देवरूख, कराड अशी ही रॅली काढताना त्यात सहभागी झालेल्या युवकांनी ठिकठिकाणी पथनाटय़े, चर्चासत्रे, व्याख्याने, स्लाईड शो अशा विविध माध्यमांतून वाघ वाचवण्यासाठी जनजागृती केली. या रॅलीदरम्यान उपस्थितांपुढे बोलताना प्रसाद हिरे म्हणाले की, वाघांची संख्या काही वर्षापूर्वी 40 हजारांच्या आसपास होती. सध्या ती 1706 पर्र्यंत खाली आली आहे. महाराष्ट्रात वाघांच्या संवर्धनाकरिता सध्या पेंच-मेळघाट आणि ताडोबा-अंधारी हे व्याघ्रप्रकल्प अस्तित्वात असून तिसरा प्रकल्प सह्याद्री खोर्यात साकार होत आहे. या प्रकल्पामुळे या पट्टय़ातील वाघ वाचतील. कोणतीही अडचण न येता हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरावा या दृष्टीने आम्ही ही जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. |
Post Top Ad
30 November 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment