महाराष्ट्र तिसर्या क्रमांकावर
नवी दिल्ली : गुन्हेगारीच्या बाबतीत आघाडीवर असणारे उत्तर प्रदेश आणि बिहार ही दोन्ही राज्ये गरिबीच्या बाबतीतही अव्वल ठरली आहेत. देशातील सर्वात गरीब जनता उत्तर प्रदेशात वास्तव्यास असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यापाठोपाठ क्रमांक दोनला बिहार आणि महाराष्ट्र क्रमांक तीनला असल्याचेही सरकारने सांगितले आहे. वर्ष 2009-10 नुसार 7 कोटी 37 लाख इतकी गरीब लोकसंख्या उत्तर प्रदेशात आहे. त्यानंतर बिहारमध्ये 5 कोटी 43 लाख आणि महाराष्ट्रात 2 कोटी 7 लाख इतके लोक गरीब असल्याचे योजना राज्यमंत्री राजीव शुक्ला यांनी सांगितले आहे. जनार्दन वाघमारे आणि एन. के. सिंह यांनी विचारलेल्या प्रश्नाला राजीव शुक्ला यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती उजेडात आली आहे. या तिन्ही राज्यांतील गरिबी निर्मूलनासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकार बिहार आणि उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडमध्ये विशेष पॅकेज लागू करत असल्याचेही ते म्हणाले.
Post Top Ad
30 November 2012
Home
Unlabelled
देशातील सर्वात गरीब जनता उत्तर प्रदेशात
देशातील सर्वात गरीब जनता उत्तर प्रदेशात
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment