नवी दिल्ली / वृत्तसंस्था : चालू आर्थिक वर्ष जवळ जवळ संपायला आले असताना आर्थिक अडचणीत असलेले केंद्र सरकार सार्वजनिक उपक्रमांतील भांडवल खुल्या बाजारात विकून म्हणजेच निर्गुतवणूक करून केवळ 932 कोटी रुपयेच जमा करू शकले आहे. सरकारने निर्गुतवणुकीतून या वर्षी एकूण 30 हजार कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट अर्थसंकल्पात मांडले होते. सरकार हे उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रयत्न करीत असल्याची माहिती संसदेत गुरुवारी देण्यात आली.
चालू आर्थिक वर्षात सरकारने एनबीसीसी कंपनीचे दहा टक्के आणि हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (एचसीएल) मधील 5.8 टक्के भांडवल खुल्या बाजारात विकले आहे. या दोन कंपन्यांतील भांडवल विक्रीतून सरकारला अनुक्रमे 124.97 कोटी आणि 807.02 कोटी रक्कम मिळाली आहे.
अशाप्रकारे सरकारकडे एकूण 931.99 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती अर्थमंत्री चिदंबरम यांनी दिली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षी सरकारची महसुली तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 5.1 टक्के म्हणजेच 5.13 लाख कोटी होईल, असा अंदाज आहे. एपिल्र ते सप्टेंबरदरम्यान महसुली तूट वर्षभराच्या अपेक्षित तुटीच्या 65.6 टक्के झाली आहे. स्वत: अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीदेखील यंदा महसुली तूट 5.3 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे.
Post Top Ad
30 November 2012
Home
Unlabelled
निर्गुतवणुकीतून मिळाले फक्त 932 कोटी
निर्गुतवणुकीतून मिळाले फक्त 932 कोटी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment