दत्तक वस्ती योजना गुंडाळण्याचा डाव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2012

दत्तक वस्ती योजना गुंडाळण्याचा डाव

पल्रंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा
मुंबई : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेली दत्तक वस्ती योजना गुंडाळण्याचा डाव आखण्यात आला आहे. या योजनेच्या जागी स्वच्छ प्रबोधन मुंबई अभियान योजना आणण्याचा खटाटोप सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी सामाजिक संस्था आणि स्वंयसेवकांनी एकत्रितपणे आझाद मैदानात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

2001 साली मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी दत्तक वस्ती योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून अंदाजे 10 हजारांहून आधिक स्वयंसेवक स्वत:चे पोट भरत आहेत. या योजनेच्या जागी महापालिकेने स्वच्छ प्रबोधन मुंबई अभियान योजना आणण्याचे ठरवले आहे. त्यामुळे दत्तक वस्ती योजनेत काम करणार्‍या हजारो गोरगरीबांच्या रोजीरोटीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. या योजनेच्या जागी स्वच्छ प्रबोधन मुंबई अभियान योजना आणत असल्यामुळे गोरगरीबांच्या जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी सांगितले. दत्तक वस्ती योजनेसाठी स्वतंत्र कायदा लागू करण्यासह अन्य पल्रंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय सामाजिक सम्यक संघटनेच्या वतीने आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS