रिक्त पदे भरण्याचे आदेश
मुंबई : अग्निशमन दलातील विभागीय अधिकार्यांची रिक्त पदे लवकरच भरली जातील, असे आदेश संबंधित खातेप्रमुखांना दिले आहेत. अग्निशमन दलातील 6 विभागीय अधिकार्यांनी पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे त्या पदांचा अतिरिक्त कार्यभार सहाय्यक विभागीय अधिकार्यांवर पडत आहे, अशी तक्रार करत शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी ही रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत केली.
मुंबई अग्निशमन दलाचे अग्निशामक व ऑडिट असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. या संदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी दिली. मुंबईत अग्निशमन दलाची 33 केंद्रे आहेत. 3 हजारांपेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी आहेत. मुंबईचे वाढते शहरीकरण व इमारती बांधकामे पाहता इमारतींमधील अग्निशामक यंत्रणेची तपासणी करणे व ऑडिट तयार करणे यासाठी आता अग्निशमन दलाचा स्वतंत्र ऑडिट विभाग तयार करण्यात आला आहे. त्यासाठी 100 कर्मचारी व अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आगीवर नियंत्रण मिळवणे व इतर घटनांप्रसंगी अग्निशामक विभागातील कर्मचारी व अधिकारी काम करतील.
Post Top Ad
08 November 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment