कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास हिरवा कंदील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2012

कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास हिरवा कंदील


मुंबई : कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडवर भरणी व कचरा टाकण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी हिरवा कंदील दाखवला. यापूर्वी कचरा टाकण्यास केलेली मनाई न्यायमूर्ती डी.डी. सिन्हा आणि न्यायमूर्ती के.के. तातेड यांच्या खंडपीठाने उठवली.कांजूर डम्पिंग ग्राऊंडच्या विरोधात वनशक्ती ही स्वयंसेवी संस्था व स्टॅलीन दयानंद यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. या वेळी पालिकेच्या वतीने अँड.एस.यू.कामदार यांनी बाजू मांडली. पालिकेने कोणत्याही प्रकारे उल्लंघन केलेले नाही. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने दिलेल्या जागेवरच पालिकेने ड¨म्पग ग्राऊंड सुरू केले. तसेच कचरा टाकताना कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले जात नाही. त्याचप्रमाणे कचरा टाकण्याचे ठिकाण हे सीआरझेड क्षेत्रात असले तरी खारफुटी नष्ट होणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने कचरा टाकण्यासाठी केलेली मनाई उठवली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS