बाळासाहेबांच्या स्मारकाची जाहीर मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2012

बाळासाहेबांच्या स्मारकाची जाहीर मागणी


मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क येथेच व्हावे, अशी जाहीर मागणी माझी आरपीआयच्या वतीने गुरुवारी आझाद मैदानात करण्यात आली. या वेळी माझी आरपीआयचे संस्थापक बाळासाहेब (जगन्नाथ अरुण) व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. माझी आरपीआय सलग्न भारतीय कलावंत महासंघ यांच्या वतीने शेकडो कार्यकर्ते कलावंत गुरुवारी आझाद मैदानात उपस्थित होते. या वेळी बोलताना. बाळासाहेब (जगन्नाथ अरुण) म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कवर होणे गरजेचे आहे. कारण शिवसेना म्हणजे शिवाजी पार्क व शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे समीकरण सर्व जगाला माहीत आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कवर करण्याची जाहीर मागणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS