मुंबईत पाणीकपात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2012

मुंबईत पाणीकपात

मुंबई : भांडुप संकुल उदंचन केंद्रामध्ये विद्युत क्षमता वाढवण्यासाठी 3.3 के.व्ही. क्षमतेचे कॅपॅसीटर्स बँक व एपीएफसीपॅनल बसवण्याचे काम सोमवारी सकाळी 8 वाजता सुरू होणार असून ते दुसर्‍या दिवशी मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरू राहणार आहे. याशिवाय गांधीनगर भांडुप येथे 750 मि.मी बाय 600 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी जोडणीचे काम सोमवारी रात्री साडेअकरा वाजता सुरू होणार असून ते दुसर्‍या दिवशी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढील विभागात पाणीपुरवठय़ात कपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी या कारणास्तव पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
20 टक्के पाणी कपात 
सोमवार : 20 टक्के पाणीकपात (सकाळी 8 ते मध्यरात्री 12 पर्यंत)
क्र. विभाग विस्तृत विभाग प्रमाण

1 प.उपनगर वांद्रे ते दहिसर 
2 शहर ए, सी, डी, जी/दक्षिण 
जी/उत्तर आणि अंशत: बी व ई विभाग 
3 टी मुलुंड पूर्व आणि पश्चिम 
4 एस भांडुप प., कांजूरमार्ग प. आणि विक्रोळी प. विभाग
5 एन विक्रोळी प. आणि घाटकोपर प.
6 एल कुर्ला प. 
मंगळवार : 20 टक्के पाणीकपात (रात्री 12 ते स. 5 वाजेपर्यंत)
क्र. विभाग विस्तृत विभाग 
1 प. उपनगर वांद्रे ते दहिसर 
2 शहर ए, सी, डी, जी/दक्षिण 
जी/उत्तर आणि अंशत: बी व ई विभाग 
3 टी मुलुंड पूर्व आणि पश्चिम 
4 एल कुर्ला प. 
5 एस भांडुप प., कांजूरमार्ग प., विक्रोळी प. (पाणीपुरवठा नाही.)
6 एन विक्रोळी प. आणि घाटकोपर प. (पाणीपुरवठा नाही.)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS