आंबेडकरांच्या स्मारकाला व स्थानकाच्या नावाला मनसे काँग्रेसचा विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2012

आंबेडकरांच्या स्मारकाला व स्थानकाच्या नावाला मनसे काँग्रेसचा विरोध


मुंबई / अजेयकुमार जाधव 
इंदू मिल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यास व दादर रेल्वे स्थानकाला आंबेडकर यांचे किवा चैत्यभूमी असे नाव देण्यास मनसे, काँग्रेसचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच स्मारक होणार. आंबेडकर यांच्या स्मारकासाठीच इंदू मिलची जागा राखीव ठेवण्यात आली आहे असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले असताना बाळासाहेब ठाकरें यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्त्वाला साजेसं स्मारक उभारण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये मोठी जागा नाही. पण, इंदू मिलमध्ये असं मोठं स्मारक उभारलं जाऊ शकतं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य असं स्मारक दादरमध्ये नाही तर इंदू मिलमध्ये उभारलं जावं’ अशी मागणी मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केलीय. तसंच, काँग्रेसच्या सुनील मोरेंनीही इंदू मिलमध्येच बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारलं जावं, असं म्हणत मनसेला पाठिंबाच दिलाय.

दरम्यान, दादरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी असल्याने दादर स्थानकाला चैत्यभूमी किवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे नाव द्यावे अशी मागणी आंबेडकरी जनतेमधून केली जात असतानाच दादर स्थानकाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्यावं, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेविका नयना शेठ यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS