मुंबई : आझाद मैदान दंगलीनंतर पोलिसांनी मुस्लिम समाजातील कॉलेज तरुण, नोकरदार, व्यावसायिक आदी निष्पाप तरुणांना अटक करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. हे योग्य नाही, असे स्पष्ट करत हे अटकसत्र बंद केले नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारत मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष किशोर जगताप यांनी गुरुवारी पत्रक ार संघ येथे दिला. मुस्लिम तरुणांविरोधात पोलीस बिनबुडाचे राजकारण करत आहे. तपासकार्य प्रामाणिक व नि:पक्ष असले पाहिजे. दहशतवादी प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रक न्यायालये स्थापन करण्यास सरकार उशीर का लावत आहे. न्यायालयातून निर्दाेष सुटलेल्या काही लोकांची 20 वष्रे तुरुगांतच गेली असल्याची उदाहरणे आहेत. अशा प्रकारचा न्याय नसावा, असे किशोर जगताप यांनी या वेळी सांगितले.
Post Top Ad
23 November 2012
Home
Unlabelled
निष्पाप तरुणांचे अटकसत्र बंद करा
निष्पाप तरुणांचे अटकसत्र बंद करा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment