मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये बुधवारी सकाळी ७.30 वाजता फाशी देण्यात आली, ही माहिती राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. २६/११ च्या हल्ल्यात बळी गेलेल्या १६६ निरपराध लोकांना ही खरी श्रद्धांजली आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही याबाबत पत्रकारांना माहिती दिली. या ऑपरेशनला 'एक्स' असे नाव देण्यात आले होते. कसाबला फाशी दिल्या नंतर त्याचा दफनविधी येरवडा जेल मध्येच करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली
लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी असलेल्या कसाबला मुंबई हल्ल्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुप्रीम कोर्टानेही त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. मात्र, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसाबचा दयेचा अर्ज ७ नोव्हेंबरला फेटाळला होता. सुशीलकुमार शिंदे यांनी ८ नोव्हेंबरला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारला तशी माहिती दिली होती. त्यानंतर राज्याच्या गृह मंत्रालयाने त्याच्या फाशीच्या शिक्षेची तयारी केली. महाराष्ट्रात नागपूर आणि येरवडा या दोनच तुरुंगामध्ये फाशी देण्याची यंत्रणा आहे. त्यामुळेच कसाबला मुंबईच्या आर्थर रोड जेलमधून १९ नोव्हेंबरच्या रात्री येरवड्यात हलवण्यात आले होते आणि बुधवारी सकाळी ७.३० वाजता त्याला फाशी देण्यात आली.
मुंबईवरील हल्ल्याला येत्या २६ नोव्हेंबर रोजी चार वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कसाबला दिली गेलेली फाशी भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारा असल्याचे विधीतज्ज्ञांनी म्हटले आहे. मुंबईवर २६ नोव्हेंबर 200८रोजी देशातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात १६६ लोक मारले गेले. अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी शहीद झाले होते.
हल्ल्याचा घटनाक्रम
26 नोव्हेंबर 2008 : अजमल कसाब व इतर नऊ अतिरेक्यांचा मुंबईवर हल्ला
27 नोव्हेंबर 08 : कसाबला अटक आणि नायर रुग्णालयात भरती
29 नोव्हेंबर 08 : अतिरेक्यांच्या ताब्यातून सर्व जागा मुक्त, कसाब वगळता सर्व अतिरेकी ठार
30 नोव्हेंबर 08 : कसाबची हल्ल्याची कबुली (27/28 डिसेंबर रोजी ओळख परेड)
13 जानेवारी 2009 : एम.एल.ताहिलियानी यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती
16 जानेवारी 09 : कसाबसाठी आर्थर रोड कारागृहाची निवड
5 फेब्रुवारी 09 : कसाबचा डीएनए नमुना कुबेरमधील वस्तूंशी जुळला
20/21 फेब्रुवारी 09 : कसाबचा कबुलीजबाब न्यायाधीशांनी नोंदवला
22 फेब्रुवारी 2009 : उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
25 फेब्रुवारी 2009 : कसाबविरुद्ध आरोपपत्र दाखल
01 एप्रिल 2009 : अंजली वाघमारे यांची कसाबचे वकील म्हणून नियुक्ती
15 एप्रिल 2009 : अंजली वाघमारे यांनी कसाबचे वकीलपत्र सोडले
16 एप्रिल 2009 : अब्बास काझमी यांची कसाबचे वकील म्हणून नियुक्ती
17 एप्रिल 2009 : कसाबचा कबुलीजबाब न्यायालयात उघडला
20 एप्रिल 2009 : सरकारी पक्षाचे कसाबवर 312 आरोप
06 मे 2009 : 86 आरोप निश्चित; परंतु कसाबकडून आरोपांचे खंडन
8 मे 2009 : पहिल्या साक्षीदाराची साक्ष, कसाबला ओळखले
23 जून 2009 : हाफिज सईद, जकी उर रहेमान लकवीसह 22 जणांविरुद्ध अजामीनपत्र वॉरंट
30 नोव्हेंबर 09 : अब्बास काझमी यांनी कसाबचे वकीलपत्र सोडले
01 डिसेंबर 09 : के.पी.पवार यांची कसाबचे वकील म्हणून नियुक्ती
16 डिसेंबर 2009 : सरकारी पक्षाकडून 26/11 खटला पूर्ण
18 डिसेंबर 2009 : कसाबकडून सर्व आरोपांचे खंडन
31 मार्च 2010 : खटल्याचे कामकाज पूर्ण, न्यायाधीशांकडून 3 मेपर्यंत निर्णय राखीव
03 मे 2010 : कसाब दोषी; सफीउद्दीन अहमद आणि फहीम अन्सारी निर्दोष
21 फेब्रुवारी 2011 : मुंबई उच्च न्यायालयाकडून फाशीवर शिक्कामोर्तब
मार्च 2011 : फाशीच्या शिक्षेला आव्हान देण्यासाठी कसाबचा अर्ज
10 ऑक्टोबर 11 : सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती
10 ऑक्टोबर 2011 : आपले वय लहान असल्याचा कसाबचा दावा
18 ऑक्टोबर 2011 : महाराष्ट्र सरकारकडून फहीम अन्सारी व सफीउद्दीन अहमद यांना निर्दोष सोडल्याच्या निर्णयाविरुद्ध आव्हान
23 फेब्रुवारी 2012 : सर्वोच्च न्यायालयाने 26/11चे सीसीटीव्ही फुटेज पाहिले
25 एप्रिल 2012 : अडीच महिन्यांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च् न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
29 ऑगस्ट 2012 : कसाबच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब.

5 नोव्हेंबर 2012 : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला
7 नोव्हेंबर 2012 : गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शिक्षेच्या फाईलवर स्वाक्षरी केली

19 नोव्हेंबर 2012 : मध्यरात्री कसाबला मुंबईतील आर्थर रोडवरील जेलमधून पुण्याच्या येरवडा जेलमध्ये हलविण्यात आले.
21 नोव्हेंबर 2012 : पुण्याच्या येरवडा तुरुंगात सकाळी 7.30 वाजता कसाबला फाशी देण्यात आली.

No comments:
Post a Comment