शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे स्मारक अशक्य - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 November 2012

शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे स्मारक अशक्य

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवसेना आग्रही असलेली दादर येथील शिवाजी पार्कची जागा देणे अशक्य असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक कोठे असावे, यावरून राजकीय चकमकी सुरू असतानाच मुख्यमंर्त्यांनी थेट शिवाजी पार्कचा पर्यायच बंद केला आहे. शिवाजी पार्कऐवजी इंदू मिलच्या काही जागेवर स्मारक उभारण्याबाबत काहीजण आग्रही आहेत. मात्र तेथेही आंबेडकरी जनतेचा विरोध असल्याने बाळासाहेबांचे स्मारक राज्यात नवीन वादळ निर्माण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंर्त्यांनी शिवाजी पार्क स्मारकासाठी देणे अशक्य असल्याचे हे स्पष्टीकरण दिले आहे. शिवाजी पार्क खेळासाठी मैदान आहे. तसेच त्याबाबत न्यायालयाचीदेखील वेगळी भूमिका आहे. यामुळे स्मारकासाठी शिवाजी पार्क देणे अशक्य आहे, असे मुख्यमंर्त्यांनी म्हटले आहे. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याबाबत कोणताच अधिकृत प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही. योग्य जागेवर चांगल्या प्रकारे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आलाच, तर आपण त्याचा निश्चित विचार करू असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनाप्रमुखांवर 18 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवसेनाप्रमुखांची अगोदरपासून शिवाजी पार्कशी नाळ जोडलेली होती. अशातच त्यांनी अखेरचा निरोपदेखील शिवाजी पार्कवरच घेतल्याने ती जागा शिवसैनिकांसाठी श्रद्धेचे ठिकाण झाले आहे. 

यामुळेच अनेक जण शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्यासाठी आग्रही आहेत. इतर राजकीय पक्षांतील काही जणांनीदेखील याला पाठिंबा दिलेला आहे. शिवसेनेने स्मारकाबाबत कोणतीच अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसतानाच इंदू मिलच्या काही जागेचादेखील पर्याय काही जणांनी पुढे केला आहे. परंतु मोठय़ा संघर्षानंतर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आंबेडकरी जनतेने इंदू मिलच्या जागेच्या होकार मिळविला आहे. आता ते यामध्ये कोणालाच वाटा देण्यास तयार नाहीत. अशा प्रकारे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी प्रमुख्याने चर्चेत असलेल्या शिवाजी पार्क आणि इंदू मिल या दोन्ही जागा विरोधात सापडलेल्या आहेत. मुख्यमंर्त्यांनी थेट नकार देऊन याविरोधात भर घातलेली आहे. यामुळे आता शिवसेना कोणती भूमिका घेते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सध्या शांत असलेली शिवसेना स्मारकासाठी आपल्या स्टाईलने मैदानात आली, तर मात्र स्मारकाचा मुद्दा राज्यभर वादळ निर्माण करण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS