नारायण राणे यांनी घेतली राज यांची सांत्वनपर भेट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 November 2012

नारायण राणे यांनी घेतली राज यांची सांत्वनपर भेट



मुंबई : पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते आणि नंतर काँग्रेसवासी झालेले उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर नारायण राणे यांनी प्रत्यक्ष भेटून राज ठाकरे यांचे सांत्वन केले. या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र नीतेश राणेदेखील होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले तेव्हा नारायण राणे परदेशात होते. त्यामुळे ते अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते. शनिवारी त्यांनी सकाळी कृष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरे यांची सांत्वनपर भेट घेतली. नारायण राणे यांनी सात वर्षापूर्वी शिवसेना सोडली होती. त्यांच्यानंतर काही महिन्यांनीच राज ठाकरे यांनीदेखील शिवसेनेला जय महाराष्ट्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. काँग्रेसवासी झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेवर जबरदस्त हल्ला चढवला असला तरी शिवसेनाप्रमुखांच्या विरोधात त्यांनी कधीच एक शब्दही काढला नव्हता. बाळासाहेबांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना त्यांना अश्रू आवरणे अशक्य बनले होते. बाळासाहेबांमुळेच आपण घडलो, हेदेखील त्यांनी मान्य केले होते.

दरम्यान, मातोश्रीवर जाऊन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीदेखील सांत्वनपर भेट घेण्याची नारायण राणे यांची इच्छा आहे. त्यांनी भेटीसाठी वेळही मागितली आहे, मात्र अद्याप त्यांना वेळ मिळालेली नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS