इंदू मिलची जागा फक्त आंबेडकर स्मारकासाठी राखीव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 November 2012

इंदू मिलची जागा फक्त आंबेडकर स्मारकासाठी राखीव


मुंबई / अजेयकुमार जाधव 
इंदू मिलची संपूर्ण जागा मुंबई महानगर पालिकेच्या डी पी प्ल्यान नुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राखीव असून या जमिनीवर इतर कुणाचेही स्मारक उभे केले जाणार नाही असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनाद्राज आंबेडकर यांना दिले आहे.

रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी आज दुपारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू नंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी इंदू मिलची जागा अजून मिळाली नसल्याने या जमिनीतील अर्धी जागा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला द्यावी अशी मागणी केली होती. यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे इंदू मिलच्या जमिनीवर आंबेडकर यांच्या स्मारक व्यतिरिक्त इतर कोणतेही स्मारक उभे राहू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे.

या बैठकी मध्ये आंबेडकर यांचा महापारीनिर्वान दिन जवळ येत आहे. यावेळी शिवाजी पार्क, चैत्यभूमी परिसरात लाखो भीमसैनिक येतात. सध्या या शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांचे अन्त्यासंसाकार झाल्यानंतर हंगामी मंडप व इतर बांधकाम केले आहे. यामुळे लोकांमध्ये जातीय तणाव निर्माण होऊ शकतो. म्हणून येथील बांधकाम हटवण्याची मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असून मुख्यमंत्री व केंद्र सरकारने इंदू मिल बाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यावर प्रधानमंत्र्यांनी एन.टी. सी. ला आदेश दिले असून ६ दिसेम्बारच्या आधी इंदू मिलची जागा डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाला देण्यासाठी सरकार गाभिर्य पूर्वक कार्यवाही करत आहे. यासाठी येत्या २३ नोव्हेंबरला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी संघितले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS