मुंबईमध्ये पिआरपी चे १५ लाख सदस्य करणार - प्रा. जोगेंद्र कवाडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 November 2012

मुंबईमध्ये पिआरपी चे १५ लाख सदस्य करणार - प्रा. जोगेंद्र कवाडे

मुंबई / विजया जाधव
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्य मुंबई मध्ये गतिमान करण्यासाठी पिआरपिचे १५ लाख सदस्य करण्याचे आवाहन प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मुंबई प्रदेश बैठकीवेळी केले. भिमालय येथे संपणा झालेल्या या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी मुंबई प्रदेश अध्यक्ष मिलिंद सुर्वे होते. 
       नागपूर येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्ष कार्य गतिमान करण्यासाठी पक्ष सदस्य मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार मुंबई मध्ये १५ लाख सदस्य नोंदणी करण्याचे निर्देश प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिले. यावेळी पक्ष कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यानी पक्षाची शिस्त पाळणे, जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. पक्षशिस्तीचा भंग यापुढे सहन केला जाणार नाही असा इशारा कवाडे यांनी यावेळी दिला.
       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारीनिर्वान दिनी चीत्याभूमीवर होणाऱ्या अभिवादन सभेची जय्यत तयारी सुरु असून सभेच्या तयारीसाठी मुंबई अध्यक्ष मिलिंद सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS