मुंबई : टिळक नगर पोलीस ठाण्याच्या दोघा मद्यधुंद पोलिसांच्या मारहाणीत विद्याविहार येथे राहणार्या एका 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाई कांकडून करण्यात आला आहे. विद्याविहार (पू.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर नं.1, तानसा पाइप लाइन या ठिकाणी मातंग समाजाचा तरुण कल्याण तीर्थराज साळवे (17), कृष्णा भागीरथ साळवे (18) व रामकुमार यादव हे रविवारी रात्री घराजवळील रस्त्यावर खेळत होते. त्या वेळी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळक नगर पोलीस ठाण्याचे दोघे बीट मार्शल तेथील बीयर बारमधून बाहेर पडले. त्यांनी खेळत असलेल्या मुलांना विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केली. काठीने बेदम मारहाण झाल्याने जखमी झालेल्या तिघांना राजावाडीत नेले असता उपचारापूर्वीच कल्याणचा मृत्यू झाला. हा मृत्यू दोघा पोलिसांच्या मारहाणी मुळेच झाला असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला असून विनाकारण मुलांना मारहाण करणार्या दोघा पोलिसां विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.
Post Top Ad
06 November 2012
Home
Unlabelled
पोलिसांच्या मारहाणीत मातंग समाजाच्या युवकाचा मृत्यू
पोलिसांच्या मारहाणीत मातंग समाजाच्या युवकाचा मृत्यू
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment