बेस्टला आर्थिक साहाय्याचा प्रस्ताव पालिकेत मंजूर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 November 2012

बेस्टला आर्थिक साहाय्याचा प्रस्ताव पालिकेत मंजूर


मुंबई : तोटय़ात गेलेल्या बेस्ट उपक्रमाला अर्थसाहाय्य देण्याच्या प्रस्तावाला अखेर पालिकेत मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या अंतर्गत निधीतून 1600 कोटी रुपयांचे कर्ज 10 टक्के व्याजाने देण्यास सत्ताधार्‍यांनी मंजुरी दिली.

बेस्ट उपक्रमास कर्ज देण्यासाठी पालिकेने 1600 कोटींचे कर्ज देण्याचे मंजूर केले आहे. यासाठी 12 टक्के व्याज आकारण्यात येणार होते,मात्र आधीच तोटय़ात असलेल्या बेस्टला या कर्जावर व्याज द्यावे लागल्यास आर्थिक डोलारा आणखी कोसळण्याची शक्यता आहे. त्यावर काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवला. पालिकेच्या विशेष सभेपुढे हा प्रस्ताव सोमवारी मंजुरीसठी आला होता. यावर पावणेतीन तास झालेल्या चर्चेत 20 नगसेवकांनी आपली मते मांडली. पालिकेने बेस्टला बिनव्याजी कर्ज देण्याची उपसूचना विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी मांडली होती. ही उपसूचना विरोधी पक्षांनी उचलून धरत बेस्टला व्याज आकारू नये, अशी मागणी केली. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, मनसेचे गटनेते दिलीप लांडे, राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी व्याज दर कमी करण्याची मागणी केली. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी 11 टक्के व्याज दराची सूचना केली. त्यामुळे सत्ताधारी नमते घेत असल्याचे दिसून येत विरोधकांना जोर चढला. भाजपाचे गटनेते दिलीप पटेल यांनी 10 टक्के व्याजाची उपसूचना मांडली. त्यावर अखेर प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यामुळे बेस्टला आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS